Wednesday , April 22 2026
Breaking News

येळ्ळूर येथील व्यक्तीची अनगोळ येथे निर्घृण हत्या

Spread the love

 

बेळगाव : येळ्ळूर येथील एका व्यक्तीची डोक्यात दगड घालून किंवा धारदार हत्याराने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना अनगोळ तलावा शेजारील शेतवाडीमध्ये आज गुरुवारी उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
सदर व्यक्तीचे नाव संजय तुकाराम पाटील (वय 34, रा. जिजामाता गल्ली, येळळूर) असे असून त्याला दारूचे व्यसन होते. मिळालेल्या माहितीनुसार संजय हा काल दुपारी कामानिमित्त घराबाहेर पडला होता तो रात्रीपर्यंत घरी परतलाच नाही. त्यानंतर आज गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह खून झालेल्या अवस्थेत अनगोळ तलावा शेजारील शेतात आढळून आला. मृतदेह ज्या स्थितीत आढळला त्यावरून अज्ञात मारेकऱ्यांनी संजयच्या डोक्यात फावडा वगैरे सारख्या एखाद्या अवजाराने किंवा दगडाने जबर घाव घातला असावा अशी शक्यता व्यक्त होत आहे. डोक्यात वर्मी मार लागल्याने परिणामी खाली कोसळलेल्या संजयचा अतिरक्तस्त्रावामुळे घटनास्थळीच मृत्यू झाला. पूर्व वैमनस्यातून दारूच्या नशेत झालेल्या भांडणाचे पर्यवसान सदर खुनामध्ये झाले असल्याचा कयास आहे.
आज सकाळी शेतात कामासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास खुनाचा हा प्रकार येताच त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. तेंव्हा टिळकवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्याबरोबरच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलकडे पाठवला आहे.
पोलीस उपायुक्त, टिळकवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. संजय पाटील याच्या खून प्रकरणी टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी मारेकऱ्यांची शोध मोहीम हाती घेतली आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेकायदा खाणप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

Spread the love  किणयेतील प्रकार; दोन जागांतून शासनाची लाखोंची फसवणूक बेळगाव : बेळगाव तालुक्यातील किणये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *