बारापैकी सात जागा बिनविरोध, पाच जागांसाठी सहा जण होते रिंगणात
खानापूर : नंदगड उत्तर विभाग प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाची निवडणूक शनिवारी झाली. या निवडणुकीत कर्जदार सामान्य गटाच्या पाच जागांसाठी सहाजण रिंगणात राहिल्याने निवडणूक लागली. तर उर्वरित सात जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. सामान्य कर्जदार गटातील पाच जागेसाठी कल्लाप्पा मडवाळकर, महाबळेश्वर कोलेकर, वीरेश वाली, शंकर बस्तवाडकर, हणमंत नाईक विजयी झाले आहेत. तर रूक्माणा झुंजवाडकर यांना या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. कर्जदार महिला गटातून लक्ष्मी हेंडोरी, दिव्या पाटील, इतर मागास अ वर्गातून महांतेश मुतगी, इतर मागास ब वर्गातून जयवंत खानापूरकर, अनुसूचित जाती राखीवमधून रामचंद्र मादार, अनुसूचित जमाती राखीवमधून दुर्गाप्पा तळवार तर बिन कर्जदार गटातून कल्लाप्पा बावकर बिनविरोध विजयी झाले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta