Friday , November 6 2026
Breaking News

नंदगड उत्तर विभाग कृषी पत्तीनच्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनेल विजयी

Spread the love

 

बारापैकी सात जागा बिनविरोध, पाच जागांसाठी सहा जण होते रिंगणात

खानापूर : नंदगड उत्तर विभाग प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाची निवडणूक शनिवारी झाली. या निवडणुकीत कर्जदार सामान्य गटाच्या पाच जागांसाठी सहाजण रिंगणात राहिल्याने निवडणूक लागली. तर उर्वरित सात जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. सामान्य कर्जदार गटातील पाच जागेसाठी कल्लाप्पा मडवाळकर, महाबळेश्वर कोलेकर, वीरेश वाली, शंकर बस्तवाडकर, हणमंत नाईक विजयी झाले आहेत. तर रूक्माणा झुंजवाडकर यांना या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. कर्जदार महिला गटातून लक्ष्मी हेंडोरी, दिव्या पाटील, इतर मागास अ वर्गातून महांतेश मुतगी, इतर मागास ब वर्गातून जयवंत खानापूरकर, अनुसूचित जाती राखीवमधून रामचंद्र मादार, अनुसूचित जमाती राखीवमधून दुर्गाप्पा तळवार तर बिन कर्जदार गटातून कल्लाप्पा बावकर बिनविरोध विजयी झाले आहेत.

निवडणूक अधिकारी म्हणून सहकार खात्याचे विनायक लक्षाणी यांनी काम पाहिले. कृषी पत्तीनचे मॅनेजर रमेश आचार्य यांनी विजयी उमेदवाराचे अभिनंदन केले. यावेळी विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी विजयोत्सव साजरा केला.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर तालुक्यातील रेशन वितरण व्यवस्था जिल्ह्यात अव्वल

Spread the love  रेशन दुकानदारांच्या मासिक बैठकीत सुर्यकांत कुलकर्णी यांचे गौरवोद्गार; ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *