खानापूर : खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा अडीच वर्षाचा कार्यभार नुकताच संपूष्टात आला असुन उर्वरित पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचे आरक्षण सोमवारी दि. १९ रोजी सकाळी १० पाटील गार्डन येथे जाहीर होणार आहे.
येत्या अडीच वर्षाच्या काळासाठी होणाऱ्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या आरक्षणासाठी सोमवारी दि. १९ रोजी होणाऱ्या कार्यक्रमासंदर्भात जिल्हाधिकार्यानी तहसीलदार व तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकाऱ्यांना याबाबत लेखी आदेश देण्यात आले आहेत.
त्यामुळे खानापूरात तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या सदस्याचे लक्ष आरक्षणाचे लागुन आहे.
खानापूर तालुक्यातील ग्राम पंचायतीच्या सदस्यातुन अडीच वर्षाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी जोरदार रस्सीखेच होण्याची चिन्हे दिसू लागत आहेत.
तेव्हा खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या सदस्यानी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.