Monday , September 21 2026
Breaking News

खानापूर तालुक्यातील ५१ ग्रा. पं. च्या दुसऱ्या टप्प्यातील अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचे आरक्षण उद्या जाहीर

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा अडीच वर्षाचा कार्यभार नुकताच संपूष्टात आला असुन उर्वरित पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचे आरक्षण सोमवारी दि. १९ रोजी सकाळी १० पाटील गार्डन येथे जाहीर होणार आहे.
येत्या अडीच वर्षाच्या काळासाठी होणाऱ्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या आरक्षणासाठी सोमवारी दि. १९ रोजी होणाऱ्या कार्यक्रमासंदर्भात जिल्हाधिकार्यानी तहसीलदार व तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकाऱ्यांना याबाबत लेखी आदेश देण्यात आले आहेत.
त्यामुळे खानापूरात तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या सदस्याचे लक्ष आरक्षणाचे लागुन आहे.
खानापूर तालुक्यातील ग्राम पंचायतीच्या सदस्यातुन अडीच वर्षाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी जोरदार रस्सीखेच होण्याची चिन्हे दिसू लागत आहेत.
तेव्हा खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या सदस्यानी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *