खानापूर : कर्नाटक राज्यात १ जुलै पासुन लागु होणाऱ्या गृह ज्योती योजनेची नोंदणी आज रविवारी दि. १८ पासून होत असुन महिन्याला २०० युनिट पर्यंत मोफत वीज देणाऱ्या या गृह ज्योती योजनेची सुविधा मिळविण्यासाठी सेवासिंधू पोर्टलवर आधार क्रमांक लिंक करून त्याच बरोबर मागील महिन्याची लाईट बील व आपला मोबाईल लिंक करून गृह ज्योती योजनेची सुविधा मिळू शकता. त्याचबरोबर घरमालक अथवा भाडेकरू यांना सेवासिंधू पोर्टलवर त्याचे आधार कार्ड लिंक करून गृह ज्योती योजनेची सुविधा मिळू शकते, अशी माहिती हेस्काॅमच्या कार्यकारी अभियंत्या सौ. कल्पना तिरवीर यांनी रविवारी खानापूर हेस्काॅम कार्यालयात गृह ज्योती योजनेच्या नोंदणी कार्यक्रमात बोलताना दिली.
प्रारंभी हेस्काॅमचे ऑकाऊंट ऑफिसर नमित इजारी यांनी य प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी उपस्थिताच्याहस्ते महात्मा गांधींच्या फोटो प्रतिमेचे पुजन करून गृह ज्योती योजना फलकाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला हेस्काॅमचे नागेश दौलतकर, जावेद नाईकवाडी, श्री. अचिमनी, राजू पारेकर, ग्राम पंचायत प्रतिनिधी व लाईन मन, कर्मचारी वर्ग, त्याचबरोबर ऍड. अरूण सरदेसाई, प्रकाश मजगावी आदी नागरीक उपस्थित होते.