खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीला आजपर्यंत अनेक चिफ ऑफिसर होऊन गेलेत. मात्र आतापर्यंतच्या कोणत्याही चिफ ऑफिसरनी चारचाकी वाहनाची मागणी केली नाही.
मात्र नुकताच आलेल्या आर. के. वठार या चिफ ऑफिसरनी आल्याआल्या चारचाकी नविन वाहनाची मागणी केली. जो पर्यंत नविन चारचाकी वाहनाची व्यवस्था होत नाही. तोपर्यंत रोज भाड्याने चारचाकी वाहनाची व्यवस्था केली आहे. आजपर्यंत कोणत्याच चिफ ऑफिसरनी नगरपंचायतींवर चारचाकी वाहनाची मागणी करून नगरपंचायतींवर फालतु खर्च केला नाही. गेल्या वर्षभरात पासुन नगरपंचायतींचे चिफ ऑफिसरनी चारचाकी वाहनाची मागणी करून नगरपंचायतींवर वाढता खर्चाचा बोजा करून ठेवला आहे. हे एवढेच नसुन चिफ ऑफिसरनी खानापूर शहरात वेगवेगळ्या प्रकरणात खानापूर शहरवासीयांना विनाकारण त्रासात पाडले आहे.
खानापूर शहराच्या वाजपेयी नगरातील नामफलक काढून वादाचा प्रसंग ओढवला आहे.
आता नगरपंचायतींच्या चिफ ऑफिसरनी एक वेगळाच निर्णय घेतला असुन नगरपंचायतींच्या घरपट्टी वसुली, पाणीपट्टी वसुली, तसेच इतर विभागात काम करत असलेल्या कर्मचारी वर्गाला चक्क खानापूर शहरातील सफाई कामगार म्हणून काम करण्याचा आदेश काढला आहे.
त्यामुळे नगरपंचायतींच्या कर्मचारी वर्गातून चिफ ऑफिसर बद्दल नाराजी पसरली आहे.
याबाबत नगरसेवक लक्ष्मण मादार, प्रकाश बैलूरकर, रफिक वारेमनी आदी चिफ ऑफिसर आर. के. वठार यांना चांगलेच धारेवर धरून जाब विचारला आहे.
मात्र चिफ ऑफिसर आपल्याच मतावर ठाम आहेत. अशा चिफ ऑफिसरची तडकाफडकी बदली करावी, अशी मागणी नगरसेवकासह, कर्मचारी तसेच खानापूर शहरातील नागरिकांतून होत आहे.
याकडे जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी तसेच खानापूरचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी त्वरीत लक्ष देऊन बदली करावी, अशी सर्व घरातून मागणी होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta