खानापूर : खानापूर लायन्स क्लबचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. या सुवर्णमहोत्सवाचा कार्यक्रम दि. २ जुलै रोजी येथील लोकभवन येथे दुपारी ४ वा. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे..
या सुवर्णमहोत्सवी वर्षात खानापूर लायन्स क्लबच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती शिवस्मारक येथे बोलावलेल्या पत्रकार परिषदेत लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष डॉ. राधाकृष्ण हेरवाडकर यांनी दिली. यावेळी लायन चब्बाण्णा होसमणी, खजिनदार लायन भाऊराव चव्हाण, एम. जी. कुमार, अजित पाटील, महेश पाटील, डॉ. प्रकाश बेतगावडा हे उपस्थित होते.
यावेळी डॉ. राधाकृष्ण हेरवाडकर बोलताना म्हणाले, १९७३ साली बेळगाव लायन्स क्लबच्या मार्गदर्शनातून खानापूरसारख्या दुर्गम भागात लायन्स क्लब स्थापन करण्यात आली.
गेल्या ५० वर्षात लायन्स क्लबच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत. लायन्स क्लबचे ५० वे वर्ष असून या सुवर्णमहोत्सव वर्षात विविध उपक्रम राबवण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून एम. जे. एफ. सुगला एलमरी, डिस्ट्रीक्ट गव्ह. जे. एफ. अर्ली बिटो, प्रमुख वक्ते प्राचार्य अशोक दास इचलकरंजी हे उपस्थित राहणार आहेत. उद्घाटक म्हणून आमदार विठ्ठल हलगेकर तसेच एमजेएफ लायन श्रीकांत मोरे, मनोज मानके, जय नाईक हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खानापूर लायन्स क्लबचे अध्यक्ष बी. एम. हम्मन्नावर, डॉ. डी. पी. वागळे, जुनेद तोपिनकट्टी, रविसागर उप्पीन यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन केले आहे. सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन यावेळी लायन्स क्लबने केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta