खानापूर : नविन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होताच खानापूरच्या बीईओ राजश्री कुडची यांची तडकाफडकी बदली झाल्याने त्यांच्या जागी बेळगांव शहराचे बीईओ रवी बजंत्री यांची नेमणूक होताच सोमवारी दि. ३ जुलै रोजी सायंकाळी तीन वाजता आपल्या कार्याचा पदभार स्विकारला.
यावेळी खानापूर बीईओ कार्यालयाचे मॅनेजर प्रकाश होसमनी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी तालुक्यातील विविध शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यानी नुतन बीईओ रवी बजंत्री यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
एकीकडे जुन्या बीईओ राजश्री कुडची यांचा निवृत्तीचा काळ एक वर्षाचा असताना, तसेच बीईओ म्हणून तीन वर्षाचा काळ संपला नाही. अशा परिस्थितीत त्यांची उचलबांगडी झाल्याने बीईओ राजश्री कुडची यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.
तेव्हा खानापूर बीईओ कार्यालयाला कोण बीईओ असणार याची चर्चा खानापूर शहरासह तालुक्यातील शिक्षक वर्गातून होताना दिसत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta