Monday , September 21 2026
Breaking News

मुंबई -आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ भीषण अपघात; 12 जणांचा चिरडून मृत्यू

Spread the love

 

मुंबई : धुळे – मुंबई – आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. ब्रेक फेल होऊन कंटेनर एका हॉटेलमध्ये शिरल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात 12 जणांचा चिरडून जागीच मृत्यू झाला आहे. तर या भीषण अपघातात पंधरा ते वीसजण जखमी झाले आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासनेर हे गाव मध्य प्रदेशच्या सीमेवर येतं. याच गावाजवळ साधारणतः दुपारी 12 वाजताच्या दरम्यान ही अपघाताची घटना घडली. एक कंटेनर महामार्गावरुन जात असताना त्याचा ब्रेक फेल झाला आणि तो थेट हॉटेलमध्ये शिरला. या भीषण अपघातात 12 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 15 ते 20 जण जखमी झाले आहेत. सध्या अपघातस्थळी मदतकार्य सुरू आहे. जखमींना तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, महामार्गावरुन जाणाऱ्या कंटेनरचा ब्रेक फेल झाला आणि तो थेट रस्त्याच्या कडेला असणाऱ्या हॉटेलमध्ये शिरला. या अपघातात आधी पाच जणांचा जागीच चिरडून मृत्यू झाला होता. तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळत होती. या अपघातात आता मृतांची संख्या वाढली असून आता मृतांचा आकडा 12 वर पोहोचला आहे. अपघात काहीजण जखमी झाले आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

कंटनर हॉटेलमध्ये शिरल्यानं अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी हॉटेलच्या बाहेर इतरही अनेक वाहानं उभी होती. कंटेनर हॉटेलमध्ये शिरताना त्या वाहानांनाही धडकला. या अपघातातील जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *