Friday , November 22 2024
Breaking News

लोंढा आरएफओ गौराणीच्या गुंडगिरीचा भाजपकडून निषेध

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : लोंढा (ता. खानापूर) चे आरएफओ प्रशांत गौराणी यांनी माजी जि. पं. सदस्य व भाजप नेते बाबूराव देसाई यांना रविवारी लोंढा वनविभागाच्या कार्यालयात बोलावून शिवीगाळ करत कपाळाला पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सोमवारी बोलविलेल्या पत्रकार परिषेद बाबूराव देसाई यांनी सांगितले.
ते बोलताना म्हणाले की, माचाळी गावची समस्या सोडविण्यासाठी आरएफओ प्रशांत गौराणी यांना दोन तीन वेळा फोन केला. मात्र फोन उचलला नाही. काही वेळाने गौराणी यांनी फोन करून अर्वाच्च शब्दात शिवीगाळ केली व गार्डना त्याच्या घरी पाठवुन पकडून आणण्यास सांगितले यावेळी बाबूराव देसाई यांनी मी काही गुन्हा केला नाही. मला कशाला नेता. असे सांगितले मात्र बळजबरी केल्याने तेच दुचाकीवरून रेंज ऑफिसमध्ये गेले. यावेळी गार्डच्या बंदोबस्तात शिवीगाळ करत कपाळावर पिस्तूल लावली व जीवे मारण्याची धमकी दिली.
एकटेच असल्याने सर्व प्रकार सहन केला.
याबाबत खानापूर तालुका भाजपने पत्रकार परिषदेत निषेध करून आरएफओ प्रशात गौराणी यांना निलंबित करावे अशी मागणी केली. तसेच खानापूर पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्याची केली.
यावेळी भाजप तालुका अध्यक्ष संजय कुबल यांनी जनतेचा सेवक म्हणून काम करणाऱ्या आरएफओ अधिकाऱ्याने भाजपच्या नेत्याला पिस्तूलचा धाक दाखवला. तर सामान्य माणसाचे काय? यासाठी भाजपतर्फे त्याच्या निलंबनाची मागणी करत आहेत. व त्याचा निषेध करतो.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजप नेते विठ्ठलराव हलगेकर, किरण येळ्ळूरकर, जोतिबा रेमाणी, पंडित ओगले, सुरेश देसाई, ऍड चेतन मणेरीकर, आदीनी आरएफओच्या कृतीचा निषेध व्यक्त केला.
यावेळी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल होऊन वनमंत्री उमेश कत्ती यांच्याकडे रितसर तक्रार करून निलंबनाची कारवाईची मागणी करणार असल्याचे सांगितले.
यावेळी वसंत देसाई, अशोक देसाई, गुंडू तोपिनकट्टी, प्रकाश निलजकर, प्रकाश गावडे, यशवंत गावडे, तानाजी गोरल, अमोल बेळगावकर, गजानन पाटील, श्री. बडीगेर, हरिभाऊ गोरल, आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती

Spread the love खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *