खानापूर : हलगा (ता. खानापूर) ग्राम पंचायत पुढील ३० महिन्यासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड गुरूवारी दि. २० रोजी पार पडली. यावेळी अध्यक्ष पदासाठी महाबळेश्वर परशराम पाटील (मेरडा) यांची तर उपाध्यक्षपदी सौ. मंदा महादेव पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग पाटील, रणजित पाटील, प्रविण गावडा, सुनिल पाटील, सदस्या स्वाती सदानंद पाटील, नाझिया सनदी, इंदिरा मेदार, सावित्री मादार यांनी बिनविरोध निवडीसाठी खूप परिश्रम घेतले.
यावेळी माजी आमदार व डीसीसी बॅंक संचालक अरविंद पाटील यांनी निवडणूक बिनविरोध व्हावी याचे प्रयत्न सार्थकी ठरले. तसेच लैला शुगर कारखान्याचे एम डी सदानंद पाटील व इतर कार्यकर्त्यांनी नुतन अध्यक्ष, उपाध्यक्षाचा पुष्पहार घालून सत्कार केला.
हलगा ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित अध्यक्ष महाबळेश्वर पाटील (मेरडा) यांनी यापूर्वी सुध्दा ग्राम पंचायतीच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या प्रयत्नानाने दोन वेळा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे यावेळीही अध्यक्षपदी महाबळेश्वर पाटील (मेरडा) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी ग्राम पंचायतीच्या सदस्यासह, नागरिकांनी अध्यक्ष व उपाध्यक्षांचे अभिनंदन केले.
त्यामुळे नवनिर्वाचित अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांचे खानापूर तालुक्यातून अभिनंदन होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta