Tuesday , March 3 2026
Breaking News

लोंढा येथे आर्थिक व्यवहारातून दोघांवर ब्लेडने हल्ला

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुक्यातील लोंढा गावात क्रिकेट सट्ट्याच्या पैशाच्या कारणावरून दोघांवर ब्लेडने वार करून गंभीर जखमी करण्यात आले असून या हल्ल्यात लोंढा गावातील रहिवासी अल्ताफ नाईक व इरफान मेहबूब देशपायीक हे गंभीर जखमी झाले असून बेळगाव येथील आसिफ जमादार आणि उमर शेख या दोघा हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, लोंढा येथील युवकाचे बेळगाव येथील काही जणांबरोबर आर्थिक व्यवहार होते. लोंढा येथील युवकाने रक्कम देणे होती. याबाबत विचारण्यासाठी बेळगाव येथील तिघेजण लोंढा येथे गेले होते. त्यावेळी झालेल्या बाचाबाचीत बेळगाव येथून आलेल्या युवकांनी ब्लेडने वार केल्याने अल्ताफ इस्माईल नाईक, इरफान मेहबूब देशपायीक दोघेही राहणार लोंढा हे जखमी झाले. त्यांना लोंढा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून उपचारासाठी खानापूर सरकारी दवाखान्यात आणण्यात आले. मात्र खानापूर दवाखान्यातील डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करून बेळगाव येथील बिम्स हॉस्पिटल येथे अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
खानापूर पोलीस ठाण्यात अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झाला नसून खानापूर पोलिसांनी बेळगाव येथील तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *