खानापूर (प्रतिनिधी) : नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीलाच प्राथमिक शाळा शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया पार पडली.
याचा सर्वात जास्त फटका खानापूर तालुक्यातील शाळांना होणार आहे. कारण खानापूर तालुका हा अतिदुर्गम व जंगलाने व्यापलेला आहे. अशा तालुक्यातील गावांना वाहतुकीची सोय नाही. तसेच जंगल भागातील गावांना सुविधा नाहीत. अशा दुर्गम भागातील शाळांना जाणाऱ्या शिक्षकाची इच्छा नसते. त्यामुळे खानापूर तालुक्यातील जवळपास ३० शाळावर कायमस्वरूपी शिक्षक नाहीत. या शाळातील शिक्षक इतरत्र बदली करून घेतल्याने समस्या गंभीर बनली आहे.
एकीकडे नविन शिक्षकाची भरती करण्याकडे चालढकल होत आहे. दुसरीकडे अतिथी शिक्षकाची संख्या आतापर्यंतची कमीच आहे. याकडे जर संबंधित शिक्षण खात्याचे बीईओ व तालुका प्रतिनिधी दुर्लक्ष केल्यास तालुक्यातील शैक्षणिक दर्जा खालावण्यास वेळ लागणार नाही.
आतापर्यंत खानापूर तालुक्यातील मराठी शाळेकडे सरकारचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळाच आहे. खानापूर तालुक्यातील अतिदुर्गम व जंगल भागातील मराठी शाळातील पटसंख्या कमी असल्याचे सरकारला दिसते. मात्र त्यामागील कारण शोधण्याचा प्रयत्न कधीच केला नाही.
खानापूर तालुक्यातील दुर्गम भागाकडे शिक्षकां नापसंती असल्याने दुर्गम भागात सेवा बजावण्यासाठी शिक्षक उत्सुक नाहीत. त्याउलट त्या भागातील शिक्षक अन्यत्र जाण्याच्या प्रयत्नात आहेत.
तेव्हा संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी याकडे जातीने लक्ष देऊन शिक्षणाची होणारी हेळसांड थांबवावी, अशी मागणी तालुक्यातील जनतेतून होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta