Tuesday , March 3 2026
Breaking News

परवानगी न घेताच बेकायदेशीरपणे आमदारांनी थाटले ऑफीस!

Spread the love

 

महादेव कोळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष यांचा घाणाघात….

खानापूर : माजी आमदार डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी सरकार दरबारी प्रयत्न करून खानापूरसाठी भव्य असे देवराज अर्स भवन मंजूर करून आणले व सुंदर अशी इमारत बांधली व त्यांनी या इमारतीचे उदघाटन सुद्धा केले.

खानापूर तालुक्यामध्ये आमदारांसाठी तालुका पंचायतच्या कंपाऊंडमध्ये मोठे ऑफीस असताना सुद्धा विद्यमान आमदारांनी काल परवा आपले नवीन ऑफीस देवराज अर्स भवनमध्ये  सरकारी परवानगी न घेता बेकायदेशीरपणे थाटले….
विद्यमान आमदारांच्या या बळजबरीने बळकवलेल्या ऑफीस विरूद्ध तात्काळ कारवाई करून देवराज अर्स भवन खाली करून द्यावे, अशी मागणी तालुका ऑफीसर बीसीडब्लू विभाग व तहसिलदार यांचेकडे ब्लॉक काँग्रेसने केली आहे.
जर दोन दिवसांत देवराज अर्स भवनची इमारत खाली केली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध निलंबनाची मागणी करणार असल्याचेही महादेव कोळींनी म्हटले आहे.
उद्या कोणी ही उठेल व कोठे ही सरकारी जागेत ऑफीस थाटेल
२०-२१ तारखेला देवराज अर्स यांची जयंती असून ती कोठे साजरी करायची असा प्रश्न आता तालुक्यातील जनतेस व अधिकाऱ्यांना पडला आहे.
त्यामुळे विद्यमान लोकप्रतिनिधीनी देवराज अर्स भवन मधील आपल्या ऑफीससाठी बळकावलेली जागा ताबडतोब खाली करून घ्यावी अशी मागणी सुद्धा खानापूर ब्लॉक काँग्रेस अध्यक्षांनी तहसिलदार व संबंधित विभागाकडे केली असून या सर्व प्रकाराची गांभीर्याने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासंदर्भात सुद्धा मागणी केली आहे.
आजच महादेव कोळी यांनी यासंदर्भातील निवेदन तहसिलदार खानापूर व संबंधित विभागाच्या तालुका ऑफीसर यांना दिले आहे. तसेच वरिष्ठांनासुद्धा कळविले आहे.

देवराज अर्स भवनमधील ऑफीस जर हालविले नाही तर काँग्रेसतर्फे जोरदार आंदोलन केले जाईल. याची संबंधित विभागाने दखल घ्यावी, असेही महादेव कोळी म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *