Monday , September 21 2026
Breaking News

डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृतिदिन कार्यक्रम उद्या 

Spread the love

 

बेळगाव : अंधश्रद्धा निर्मूलन समिती बेळगाव व विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने उद्या रविवार, दिनांक 20 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 4.00 वाजता, मराठी विद्यानिकेतन, बेळगाव, येथे शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या 10 व्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते प्रा. सुभाष कोरे, गडहिंग्लज आणि चमत्कार सादरीकरण प्रा. प्रकाश भोईटे, गडहिंग्लज हे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी स्मृतिदिनानिमित्त घेतलेल्या निबंध स्पर्धांचे बक्षीस वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. त्या विद्यार्थ्यी व शिक्षकांनी या बक्षीस वितरण कार्यक्रमाला उपस्थित राहावे. तसेच परिसरातील सर्व मान्यवरांनी या संधीचा लाभ घ्यावा, ही विनंती.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *