
खानापूर : माजी आमदार अंजलीताई निंबाळकर यांनी इतर मागासवर्गीय समुदयासाठी सरकार दरबारी हेलपाटे मारून, सरकार दरबारी भांडून देवराज अर्स भवनची उभारणी खानापूर तालुक्यासाठी केली होती. सदर इमारतीत आमदार विठ्ठल हलगेकर यांनी आपले ऑफिस थाटले. पण कर्नाटक सरकारने एक आदेश काढून ऑफिस बंद करण्याचे आदेश आमदारांना धाडले.
ही इमारत इतर मागासवर्गीय जनतेच्या कल्याणकारी योजंनांच्या अंमलबजावणी साठी, सरकारी प्रशिक्षणासाठी, जनसेवेसाठी बांधली होती. परंतु विद्यमान आमदारांनी विना परवाना बळजबरीने या इमारतीमधे आपले ऑफीस थाटले होते. हे बळजबरीने बळकावलेले ऑफीस खाली करण्यासंबंधीचा आदेश आज
सरकारने जारी केला असून आमदारांच्या ऑफीससाठी देवराज अर्स भवनमध्ये जागा देऊ शकत नाही असा सरकारी आदेश बजविण्यात आला आहे.
खानापूर ब्लॉक काँग्रेसने या सरकारी आदेशाचे स्वागत केले असून तालुक्यातील इतर मागासवर्गीय लोकांसाठी आम्ही सरकार दरबारी लढा दिला आणि ओबीसी समाजासाठी पुन्हा ही इमारत उपयोगात आणून देण्यासाठी जे प्रयत्न केले त्यासाठी माजी आमदार डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे महादेव कोळी यांनी सांगितले. तालुक्यामध्ये आमदारांसाठी सरकारी ऑफीस असून सुद्धा बळजबरीने इतर मागासवर्गीय समाजासाठी बांधलेल्या इमारतीममध्ये आपले ऑफीस थाटणे योग्य नसल्याचेही महादेव कोळी यांनी म्हटले आहे.
हा विषय राजकीय नसून इतर मागासवर्गीय समाजासाठी आम्ही सरकार दरबारी भांडलो असल्याचेही महादेव कोळी म्हणाले.
देवराज अर्स जयंतीच्या पूर्वसंधेला, खानापूरातील देवराज अर्स इमारतीने मोकळा श्वास घेतला असून उद्या देवराज अर्स जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात येईल.
Belgaum Varta Belgaum Varta