Monday , September 21 2026
Breaking News

गो-वंश संवर्धन व संगोपन शिबिराचे उद्घाटन

Spread the love

 

बेळगाव : गो-संगम या भारतीय प्रादेशिक गो-वंश संवर्धन व संगोपन यासाठी आयोजित केलेल्या शिबिराचे उद्घाटन गोमातेचे पूजन करून व विनायक लोकुर, कृष्णाजी भट, रजनीकांत भाई पटेल, प्रभू स्वदेशी, जीवनजी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

शनिवार दिनांक १९ रोजी या शिबिराची सुरुवात करण्यात आली आहे. शास्त्रीनगर येथील गुजरात भवनमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये सर्वोदय कार्यकर्ते शिवाजी कागणीकर याचे पर्यावरण विषयावर आपले विचार व्यक्त केले, प्रभू स्वदेशी यांनी देशी गो-वंश व त्यापासून तयार होणारा उत्पादनाबद्दल माहिती दिली. यानंतर सर्पमित्र प्रशांत कामात व त्यांच्या सहकार्याने सर्प शेतकऱ्यांचे मित्र आहेत हे दाखवण्यासाठी परिसरामध्ये आढळणाऱ्या विषारी व बिनविषारी सर्पा विषयी माहिती दिली. तसेच विषारी सर्प मण्यार, घोणस, नागसाप हे प्रत्यक्ष हाणून त्यांच्याबद्दल माहिती दिली. तसेच बिनविषारी सर्पाबद्दल ही माहिती दिली. धामण जातीचे साप हे शेतकऱ्याला कसे फायदेशीर आहेत व तो साप कसा बिनविषारी आहे याचीही माहिती दिली. तसेच साप चावल्यानंतर प्रथमोपचार व सरकारी दवाखान्यात त्याची औषध उपचार उपलब्ध असतात याविषयी सखोल माहिती दिली. या ठिकाणी देशी गोवंश व त्याची उत्पादने व अनेक प्रकारचे माहितीपर पुस्तकांचे स्टॉल उपलब्ध आहेत. याचा लाभ ही उपस्थित नागरिकांनी घेतला आहे. रविवार दिनांक २० रोजी या ठिकाणी अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी अनेक गो-पालक, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *