Monday , December 8 2025
Breaking News

देवराज अर्स भवनातील आमदार कार्यालय बंद पाडणे हा सूडबुद्धीचा प्रकार

Spread the love

 

भाजपचे पत्रकार परिषदेत आरोप

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरात आमदार कार्यालयाची मागणी होत असल्याने येथील शिवाजी नगरातील देवराज अर्स भवनात आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी २१ जूलै रोजी पत्र देऊन मागणी केली. त्यानुसार तालुका अधिकाऱ्यांच्या परवानगी नुसार देवराज अर्स भवनात आमदार कार्यालयाचे उद्घाटन केले.
मात्र खानापूर तालुका ब्लाॅक अध्यक्षानी आक्षेप घेत बेळगांव जिल्हा मागासवर्गीय कल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांना देवराज अर्स भवनात आमदार कार्यालयाला परवानगी नसल्याचे सांगून चक्क आमदार कार्यालयाच्या नाम फलकावर रंग लावून व ऑफिसला टाळे लावून आमदार विठ्ठलराव हलगेकर यांचा अवमान केल्याप्रकरणी रविवारी खानापूर तालुका भाजपतर्फे पत्रकार परिषद घेऊन संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी व तालुका ब्लाॅक अध्यक्षाचा निषेध व्यक्त केला.
यावेळी बोलताना जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी म्हणाले की, तालुका मागासवर्गीय कल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांकडे २१ जुलै रोजी आमदार कार्यालयालासाठी रितसर अर्ज करून मागणी केली होती. परवानगी मिळेल या हेतूने महिनाभरात कार्यालयाची तयार करून व गुरूवारी दि. १७ रोजी आमदार कार्यालयाचे आमदार, नेते यांच्या उपस्थितीत उद्घाटन केले.
मात्र दोन दिवसातच तालुका ब्लाॅक अध्यक्षानी कार्यालयाच्या विरोधात तक्रार देऊन कार्यालय बंद पाडले, एवढेच नव्हे तर आमदार कार्यालयाच्या फलकाचे रंग फासला हे कृत्य निंदनीय आहे.
यासाठी आमदार विठ्ठलराव हलगेकर हे विधानसौध बेंगळुरू येथे आमदार कार्यालयाच्या निषेधार्थ भाजपच्या आमदार समवेत निषेध करतील तसेच संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई केली जावी, अशी मागणी करतील अशी माहिती त्यानी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल यांनीही हा प्रकार निंदनीय असल्याचे म्हटले आहे.
यावेळी लैला साखर कारखान्याचे एम डी सदानंद पाटील यांनी गेल्या महिण्याभरापासुन कार्यालयाच्या परवानगीसाठी प्रयत्न केले आहेत. कार्यालयासाठी खर्चही केला आहे. असे असताना आमदार कार्यालयाच्या फलकावर रंग फासुन गैरवर्तन केल्याचे म्हटले आहे.
यावेळी पत्रकार परिषदेला सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी, सोशल मिडीया प्रमुख राजेंद्र रायका, भाजप युवा नेते पंडित ओगले, मल्लापा मारीहाळ, प्रकाश निलजकर, संजय कंची, श्री नार्वेकर, आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

तालुका समितीच्या वतीने नंदगड भागात महामेळाव्यासंदर्भात जनजागृती!

Spread the love  खानापूर : 2004 साली सीमाप्रश्नाचा खटला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *