तालुका म. ए. समितीचे मुख्यमंत्री, पालकमंत्र्याना तहसीलदाराव्दारे निवेदन
खानापूर : यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. सुरूवातीला पाऊसच झाला नाही. सध्या तर पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यातील भात पिके, उस पिके पावसाविना वाळत चालली आहे. राज्याचे मुख्यमंत्री व जिल्हा पालकमंत्री यांनी खानापूर तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर करावा, अशा मागणीचे निवेदन खानापूर तालुका म. ए. समितीच्यावतीने माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री व पालकमंत्री यांना तहसीलदाराव्दारे बुधवारी निवेदन सादर केले.
निवेदन म्हटले आहे. की, जिल्ह्यातील केवळ बेळगाव, खानापूर, कित्तूर, रामदुर्ग तालुका व्यतिरिक्त इतर तालुके दुष्काळ तालुके म्हणून घोषित केले आहे. मात्र खानापूर तालुक्यात पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे सर्व पिके वाळून जात. त्यामुळे शेतकरीवर्ग मोठ्या संकटात सापडले आहेत. तेव्हा मुख्यमंत्री व पालकमंत्र्यानी खानापूर तालुकाही दुष्काळग्रस्त तालुका म्हणून घोषित करावा, अशी मागणी केली आहे.
यावेळी खानापूर तहसील कार्यालयाचे ग्रेड टू तहसीलदार राकेश बुवा यांनी निवेदनचा स्विकार करून सरकारकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील, मुरलीधर पाटील यांनी समस्या मांडल्या. निवेदन देताना अध्यक्ष गोपाळ देसाई, चिटणीस आबासाहेब दळवी, समितीचे नेते गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, नारायण लाड, मारूती गुरव, डी. एम. भोसले, प्रकाश चव्हाण, रूक्माणा झुंजवाडकर, कृष्णा मनोळकर, म्हात्रू धबाले, पुंडलिक पाटील, प्रा. शंकर पाटील, ज्ञानेश्वर पाटील, व्यंकापा गुरव, ब्रह्मानंद पाटील, अनंत पाटील, सदानंद पाटील, शिवाजी पाटील आदी शेकडो समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.