खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतींचे चीफ ऑफिसर आर. के. वटारे यांच्या मनमानीला कंटाळून नगरपंचायतीच्या स्वच्छता कामगार व कर्मचारी वर्गाने आंदोलन छेडले.
यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर, तहसीलदार प्रकाश गायकवाड, सीपीआय नाईक यांच्या उपस्थितीत चीफ ऑफिसर आर. के. वटारे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे सांगण्यात आले. त्याला त्यांनी कबुलीही दिली असे असताना चीफ ऑफिसर आर. के. वटारे यांनी आंदोलनाला उपस्थितीत असलेल्या भाजप युवा नेते पंडित ओगले यांच्यावर खानापूर पोलिस स्टेशनमध्ये जातीवाचक शिवीगाळ केल्याची फिर्याद दाखल केली आहे.
भाजप युवा नेते पंडित ओगले यांनी कोणत्याही प्रकारची जातीवाचक शिवीगाळ केली नाही. त्यावेळी आमदार, तहसीलदार, सीपीआय अधिकारी उपस्थित होते. तेव्हा चीफ ऑफिसर आर. के. वटारे यांनी आपली फिर्याद मागे घ्यावी.
तसेच सक्तीच्या रजेवर जाण्याचे सांगूनही शनिवारी पुन्हा ऑफिसला हजर झाले. जर ते ऑफिसला पुन्हा हजर झाले तर सोमवारपासून स्वच्छता कामगार, पाणीपुरवठा कामगार व इतर कर्मचारी पुन्हा संपावर जातील. याचा परिणाम झाल्यास तहसीलदार जबाबदार असतील अशा मागणीचे निवेदन नगरपंचायतीच्या स्वच्छता कामगार व कर्मचारी वर्गाने तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना दिले.
यावेळी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी निवेदनाचा स्विकार करून योग्य न्याय देऊ असे आश्वासन दिले.
यावेळी स्वच्छता कामगार संघटनेचे अध्यक्ष शानुर गुडलार, किरण केसरकर, यल्लाप्पा हंचिनाल, श्रीदेवी कांबळे व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.