खानापूर : खानापूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राजू वटारी यांना मोकळीक देऊन सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याने त्यांच्या जागी संतोष कुरबेटी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांनी खानापूर येथे उपस्थित राहून आपला पदभार स्वीकारला आहे. यावेळी नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी अभियंता तिरुपती लमानी, राजु जांबोटी, गंगाधर कांबळे, प्रेमानंद नाईक, शोभा पतार व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
मनमानी करणारे चिफ ऑफिसर राजू वटारी यांची बदली झाल्याने सफाई कर्मचारी व नगरपंचायतीच्या सर्व अधिकारी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे. कालपासूनच सफाई कर्मचाऱ्यांनी, खानापुर शहरातील सर्व गटारे स्वच्छता करण्याची जणू मोहीमच उघडली असून सर्वत्र स्वच्छता दिसत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta