खानापूर : कर्नाटक विद्युत पारेषण महामंडळाच्या वतीने वीज क्षमता वाढविण्याच्या कामामुळे खानापूर तालुक्यातील बीडी गावातील 110 केव्ही सबस्टेशनद्वारे पुरवठा करण्यात येणाऱ्या भागात शुक्रवार 15 सप्टेंबर व शनिवार 16 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित राहणार आहे.
हिंडलगी, मंगेनकोप्प, केरवाड, बीडी, कक्केरी, चुंचवाड, रामापुर, सुरापुर, गोलिहळ्ळी, भुरणकी, करिकट्टी हंडुर-हुलीकोथल, कसमळगी, मुगळीहाळ, कडतन बागेवाडी, बिळकी, अवरोळी, चिक्कदिनकोप्प, कोडचवाड, चिक्कअंग्रोळी, कुनकीकोप्प, बेकवाड, बंकी, बसरीकट्टी, हलशी आणि शेजारील गावांचा वीजपुरवठा आणि सिंचन पंप बंद असेल, असे
कार्यकारी अभियंता यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta