
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने रविवार दिनांक २४ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी दोन वाजता माजी आमदार कै. व्ही. वाय. चव्हाण सभागृह, राजा शिवछत्रपती स्मारक येथे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या शिक्षकांचा तसेच खानापूर तालुक्यातुन निमलष्करी दलात दाखल झालेल्या मराठी भाषिक तरूणींचा तसेच कु. सिध्दी उत्तमराव कदंब-पाटील हिचा अबॅकस परिक्षेत यश मिळविल्याबद्दल शाल, श्रीफळ आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभास खालील सत्कारमूर्तींनी हजेरी लावली.
१) श्री. सुरेश बाबू घुघ्रेटकर (मुख्याध्यापक- मराठा मंडळ हायस्कूल, कापोली)
२) श्री. तुकाराम लक्ष्मण सुतार (मुख्याध्यापक- सह्याद्री हायस्कूल, गोधोळी)
३) श्री. मष्णू विठोबा चोर्लेकर (मुख्याध्यापक- लोअर प्रायमरी मराठी शाळा, मुडेवाडी)
४) श्री. ज्योतिबा शंकर गुरव (मुख्याध्यापक- हायर प्रायमरी मराठी शाळा, मोदेकोप)
५) श्री. पुंडलिक ईश्वर कुंभार (सहशिक्षक- हायर प्रायमरी मराठी शाळा, माळअंकले)
तसेच श्री. महेश विष्णू सडेकर (मुख्याध्यापक- जांबोटी हायस्कूल, जांबोटी) हे शिक्षक उपस्थित होते.
तसेच निमलष्करी दलात दाखल झालेल्या
१) कु. रोहिणी मारुती नांदुरकर, लक्केबैल
२) कु. ललिता जक्काप्पा गुरव, गणेबैल
३) कु. अश्विनी निंगाप्पा पाटील, खैरवाड
४) कु. योगिता पोमाणी नाळकर, तिवोली
५) कु. सोनाली महाराज घाडी, होनकल
६) कु. अश्विनी भुपतराव देसाई, हेम्माडगा
७) कु. संयुक्ता गोपाळ गुंडपकर, मास्केनहट्टी
८) कु. पुजा नारायण हुंद्रे, गर्लगुंजी
९) कु. राणी नामदेव पाटील, करंबळ
१०) कु. माधुरी मल्लाप्पा अंधारे, यडोगा
११) कु. मयुरी मल्लाप्पा अंधारे, यडोगा या तरूणी उपस्थित होत्या.
तसेच वय ७ वर्षे ते १२ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बनवलेल्या ब्रैनोब्रैन या स्पर्धेत राज्यस्तरीय, राष्ट्रस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय परिक्षेत यश मिळविल्याबद्दल कु. सिध्दी उत्तमराव कदंब-पाटील, गर्लगुंजी हिचा सत्कार करण्यात आला.
या मान्यवरांचा सत्कार माजी आमदार श्री. दिगंबरराव यशवंतराव पाटील, माजी सभापती श्री. मारुतीराव परमेकर, समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई, सहचिटणीस श्री. रणजीत पाटील, शहर उपाध्यक्ष श्री. मारूती गुरव, श्री. रामचंद्र गांवकर, श्री. परशराम तुकाराम देवलतकर माजी उपप्रधान मंडळ पंचायत मणतुर्गे, श्री. सुधीर पाटील ग्रामपंचायत सदस्य मणतुर्गे, सरचिटणीस श्री. आबासाहेब दळवी, श्री. तुकाराम देवलतकर, श्री. सुराप्पा पाटील, श्री. मारूती चोर्लेकर, श्री. एस. जी. शिंदे, माजी जिल्हा पंचायत सदस्य श्री. जयराम देसाई, श्री. रविंद्र शिंदे, श्री. यशवंत बिर्जे, श्री. डी. एम. भोसले गुरूजी, श्री. तुकाराम जाधव, श्री. राजाराम देसाई, श्री कृष्णा मन्नोळकर, सीमासत्याग्रही श्री. नारायण लाड, कार्याध्यक्ष श्री. मुरलीधर पाटील, कार्याध्यक्ष श्री. निरंजन सरदेसाई, श्री रुकमाणा झुंजवाडकर, ॲडव्होकेट केशव कळ्ळेकर, श्री. बी बी पाटील, श्री. रमेश धबाले इत्यादींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारादाखल आदर्श शिक्षक पुरस्कृत सत्कारमूर्तींनी आपलं मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवर निरंजन सरदेसाई यांनी प्रास्ताविक सादर केले आणि मुरलीधर पाटील, मारूती परमेकर, सतीश पाटील आणि गोपाळराव देसाई यांनी आपले विचार व्यक्त केले. या समयी उपस्थितांचे स्वागत आणि आभार प्रदर्शन आबासाहेब दळवी यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta