खानापूर : खानापूर येथील तहसीलदार कार्यालयात गेली अनेक वर्षे उपतहसीलदार म्हणून कार्य केलेले व सध्या कारवार जिल्ह्यातील जोयडा येथील तहसीलदार राजेंद्र चव्हाण यांचे सोमवार पहाटे अडीचच्या दरम्यान बेळगाव येथील केएलई हॉस्पिटल निधन झाले आहे. तर दोन दिवसांपूर्वीच आरोग्य बिघडल्याने चव्हाण हे हॉस्पिटलला दाखल झाले होते. राजेंद्र चव्हाण हे एक प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी होते. खानापूर तहसीलदार कार्यालयात त्यांनी गेली अनेक वर्ष तलाठी पासून महसूल निरीक्षक, उपतहसीलदार पदापर्यंत प्रामाणिक सेवा बजावली होती. ते गेल्या अनेक दिवसापासून खानापूर येथे तहसीलदार पदासाठी येण्यासाठी इच्छुक होते. त्यांची वर्षभरापूर्वी जोयडा येथे ग्रेड टू तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांच्या मानसिक अस्वस्थामुळे त्यांना बेळगाव येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राजेंद्र चव्हाण हे मूळ लोंढा व सध्या बेळगाव येथे वास्तव्यास होते.
बेळगाव येथील शहापूर स्मशानभूमी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta