Wednesday , March 4 2026
Breaking News

चापगाव ग्राम पंचायतीतर्फे स्वच्छता अभियान

Spread the love

 

खानापूर : 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या निमित्ताने चापगाव ग्रामपंचायतीतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्वच्छता अभियानांतर्गत चापगाव गावातील स्मशानभूमी स्वच्छ करण्यात आली. माजी ग्राम पंचायत अध्यक्ष व म. ए. समिती नेते रमेश धबाले यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्वछता मोहीम राबविण्यात आली.

चापगाव याडोगा रोडवरील स्मशानभूमी धबाले बंधूंच्या आणि गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या पुढाकाराने ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी स्मशानातील तिरडीला रंगरंगोटी करण्यात आली. त्याचबरोबर परिसरात वाढलेली झाडेझुडपे तोडून पालापाचोळा जमा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी आजी ग्रामपंचायत अध्यक्ष रमेश धाबाले, विलास धाबाले, परशराम धाबाले, अनिल बेळगावकर, सोमनिंग धाबाले, अरुण धाबाले,-तानाजी धाबाले, बळीराम धाबाले, निलेश धाबाले, फोंडू धाबाले, पुंडलिक धाबाले, संतोष धाबाले, धाकलू धाबाले, परशराम धाबाले, यल्लप्पा धाबाले, मोहन धाबाले, शमू धाबाले, सुनील धाबाले, महादेव धाबाले व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. गावकऱ्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर शहरातील अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ; खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश

Spread the love  खानापूर : खानापूर शहराअंतर्गत रस्ता रुंदीकरणास प्रारंभ झाला असून मुख्य नकाशा नुसारच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *