Saturday , June 6 2026
Breaking News

अखेर बेपत्ता संपतकुमार तेलंगणात सापडला!

Spread the love

 

खानापूर : 24 सप्टेंबरपासून बेपत्ता असलेला खानापूर तालुक्यातील कोडचवाड येथील संपतकुमार बडगेर हा तरुण सध्या तो तेलंगणा राज्यात असल्याचे समजते.

याबाबत समजलेली माहिती अशी की, गेल्या आठ दिवसापासून खानापूर तालुक्यातील कोडचवाड गावातील संपतकुमार बडगेर नामक तरुण बेपत्ता झाला होता. पण त्याची दुचाकी व मोबाईल फोन येडोगा धरणाजवळ आढळून आल्याने कुटूंबियांच्या चिंतेत भर पडली. नेमके त्याच्यासोबत घडले काय? हा प्रश्न निर्माण झाला होता. पोलिसांनी तर त्याच्या शोधार्थ जंग जंग पछाडला. मात्र संपतकुमार सापडत नसल्याने पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. जप्त केलेल्या मोबाईलचे लोकेशन ट्रॅक केल्यानंतर तो त्याच्या जुन्या टॅब सीशी जोडला गेला. वर्षभरापूर्वी वापरलेल्या टॅबचे बिल आणि ईएमआय नंबरचे लोकेशन ट्रेस केल्यावर पोलिसांना हा टॅब तेलंगणातील असल्याचे आढळले. त्यामुळे पोलिसांनी रविवारी दुपारी तेलंगणाला जाण्याचे नियोजन केले. उद्या मंगळवार दुपारपर्यंत त्याला खानापूरला आणल्यानंतर सर्व हकीकत समोर येईल. तो सुखरूप असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

About Belgaum Varta

Check Also

सुपीक जमिनींसाठी शेतकऱ्यांचा लढा तीव्र; रेल्वे प्रकल्पाविरोधात आक्षेप

Spread the love  बेळगाव : बेळगाव-धारवाड नवीन रेल्वे मार्गासाठी प्रस्तावित जमीन अधिग्रहण प्रक्रियेला परिसरातील शेतकऱ्यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *