
खानापूर : खानापूर मेडिकल असोसिएशनकडून दलित महामंडळाचे अध्यक्ष श्रीमान लक्ष्मण मादार यांचा सत्कार समारंभ पार पडला. कार्यक्रमाला असोसिएशनचे अधिकारी तसेच ज्येष्ठ डॉक्टर उपस्थित होते. लक्ष्मण मादर यांच्या कार्याचा आढावा घेतला आणि त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पाहुण्यांचा सत्कार असोसिएशनचे अध्यक्ष नाडगौडा यांच्या हस्ते करण्यात आला. व्यासपीठावर डॉ. सुळकर, डॉ. कदम, डॉ. सुनील पाटील, डॉ. हेरवाडकर आदी उपस्थित होते.
यावेळी सत्काराला उत्तर देत असताना लक्ष्मण मादार म्हणाले की, समाजातील एखादी व्यक्ती चुकीचे वर्तन करते परंतु संपूर्ण समाजाला एका विशिष्ट चौकटीतून बघितले जाते. त्या समाजाला त्यामुळे वाळीत टाकले जाते. दलित समाज आपल्या इच्छापूर्तीसाठी कायद्याचा चुकीचा वापर करतो अशी ठाम कल्पना झालेली आहे ती कल्पना मला समाजातून पुसून टाकायची आहे. आपल्या समाजाला बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वावर चालायला शिकवणे हा माझा मूळ उद्देश आहे आणि मी माझ्या कार्यातून तो पूर्ण करेन.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मदन कुंभार आणि डॉ. श्याम पाटील यांनी केले व आभार प्रदर्शन डॉक्टर नाडगौडा यांनी केले. कार्यक्रमचे नियोजन संघटनेचे सचिव डॉ. सागर नार्वेकर व डॉ. वैभव पाटील यांनी केले. यावेळी डॉ. सागर शेट्टी, डॉ. वैभव भालकेकर, डॉ. राम पाटील व इतर डॉक्टर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta