Monday , September 21 2026
Breaking News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर शिंदे-ठाकरेंचे कार्यकर्ते भिडले, दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी

Spread the love

 

मुंबई : शिवसेना प्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले. दोन्ही बाजूंनी धक्काबुक्की आणि घोषणाबाजी झाल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करून गेल्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये राडा झाला. सध्या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गद्दार…गद्दार…अशी घोषणाबाजी करत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना स्मृतीस्थळ परिसरातून बाहेर काढण्याची मागणी केली.

मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दादर परिसरात होते. त्यानंतर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिंदे गटाचे स्थानिक आमदार सदा सरवणकर, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के, शीतल म्हात्रे आदी दिवगंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यास दाखल झाले होते. त्यानंतर काही वेळाने शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी घोषणाबाजी केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

ठाकरे गट आक्रमक…
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्मृतीस्थळावरून निघून गेल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि अनिल देसाई दाखल झाले. त्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले आणि त्यांनी शिंदे गटाविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.

महिलांना धक्काबुक्की, शिदे गटाचा आरोप
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली असल्याचा आरोप शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतक म्हात्रे यांनी केला. ठाकरे गटाने घोषणाबाजी, धक्काबुक्कीला सुरुवात केली असल्याचे म्हात्रे यांनी म्हटले.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *