Wednesday , March 4 2026
Breaking News

पतीचा खून करून आत्महत्या भासल्याची पत्नीची तक्रार

Spread the love

 

खानापूर : पतीचा खून करून आत्महत्या भासवल्याची तक्रार तोपिनकट्टी येथील मृताची पत्नी रेणुका मारूती तसीलदार हिने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून समजून आले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, तोपिनकट्टी येथील रहिवासी मारुती कृष्णा तहसीलदार (वय 56) यांनी आपल्या शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती गुरूवारी सकाळी तोपिनकट्टी गावातील नागरिक भात कापण्यासाठी आपल्या शेताकडे जात असताना निदर्शनास आली.

लागलीच नागरिकांनी याची कल्पना त्यांच्या नातेवाईकांना दिली. त्यानंतर सदर मृत व्यक्तीची पत्नी व नातेवाईक त्याठिकाणी आले. एकंदर फास घेतलेली परीस्थिती पहाता मृत व्यक्तीच्या पत्नीला व नातेवाईकांना संशय आला. त्यामुळे मृताची पत्नी रेणुका मारूती तसीलदार (वय 45) हिने आपल्या नवऱ्याचा खून झाला असल्याची तक्रार खानापूर पोलिसात दिली आहे. पुढील तपास खानापूर पोलीस करत आहेत.

मारुती कृष्णा तसीलदार हे मूळ तोपिनकट्टी गावचे रहिवासी असुन सध्या ते येळ्ळूर येथील परमेश्वर नगर या ठिकाणी वास्तव्यास आहेत. तोपिनकट्टी येथे त्यांची वडिलोपार्जित जमीन असुन येळ्ळूरवरून तोपिनकट्टीला ये -जा करून ते आपली शेती करत असल्याचे समजते. परंतू शेतीत त्यांना व्यवस्थित वाटणी न मिळाल्याने ते काळजीत होते असे समजते. काल बुधवारी रात्री गावातील एका हॉटेलात चहा पिऊन, भडंग बांधून घेतला व शेताकडे जातो असे सांगून ते गेले, असे समजते.

खानापूर पोलीस पुढील तपास करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *