
बेळगाव : युवा स्पोर्ट्स हलशीवाडी यांच्यावतीने शुक्रवार ता. 26 जानेवारी ते रविवार ता 28 पर्यंत सकाळी दहा वाजल्यापासून हाफ पीच (सर्कल) क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
गावातील विठ्ठल मंदिर समोरील मैदानात क्रिकेट स्पर्धा होणार असून
स्पर्धा एक गाव एक संघ असणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला
१११११ उज्वला संभाजीराव पाटील अध्यक्षा साहेब फाउंडेशन बेळगाव यांच्यातर्फे तर उपविजेत्या संघाला ५५५५ बक्षीस मंडळातर्फे देण्यात येणार असून उत्कृष्ठ फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आधी बक्षीस देण्यात येणार आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार अरविंद पाटील, खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई आदींच्या उपस्थितीत होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत सदस्य दिनेश देसाई असणार आहेत. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी
मिलिंद देसाई – ७७६०६८८७१० किंवा राजन सुतार ८१३९९०१९१९ यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta