खानापूर : येथील मराठा मंडळ कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या नूतन प्राचार्यपदी कॉमर्सच्या प्राध्यापिका डॉ.(श्रीमती) जे. के. बागेवाडी यांची निवड संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती राजश्री नागराजु यांनी केली.
पूर्व प्राचार्य जी.वाय.बेन्नाळकर यांची बेळगाव महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी निवड झाल्यामुळे या जागी डॉ.(श्रीमती) जे.के. बागेवाडी यांची निवड करण्यात आली. डॉ.(श्रीमती) जे.के. बागेवाडी एक उच्चशिक्षित, सरळ स्वभावाच्या, मनमिळावू वृत्तीच्या प्राध्यापिका म्हणून नाव कमाविले आहेत. प्राचार्य होण्याच्या पूर्वी त्या महाविद्यालयाच्या नॅक समितीच्या संयोजिका तसेच महाविद्यालयाच्या आणि विध्यापिठाच्या अनेक समितीमधून कार्य केले आहेत.
खानापूरच्या इतिहासात मराठा मंडळ पदवी महाविद्यालयाच्या पहिल्या महिला प्राचार्य बनण्याचा मान त्यांनी मिळविला आहे. रामदुर्ग महाविद्यालयाचे माजी प्राचार्य कै. ईश्वर के. जाधव यांच्या त्या पत्नी आहेत. नूतन प्राचार्य पदी निवड झाल्याबद्दल डॉ.(श्रीमती) जे. के. बागेवाडी यांचा नुकताच महाविद्यालयाच्या मार्फत सत्कार करण्यात आला. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Check Also
खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती
Spread the love खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून …