खानापूर (प्रतिनिधी): खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची व्यापक बैठक सोमवारी दि. १९ रोजी दुपारी २ वाजता येथील शिवस्मारक भवनातील माजी आमदार कै. व्ही. वाय. चव्हाण सभागृहात बोलविण्यात आली आहे.
यावेळी बेळगाव युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके व मदन बामणे याच्या पुढाकाराने बेळगाव येथे म. ए. समिती कोव्हीड सेंटर चालवुन अनेक जणांचा जीव वाचविला, या कार्याबदल त्यांचा जाहीर सत्कार करणार आहे.
यावेळी खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीत जी फूट पडली आहे. ती फूट बाजुला सारून, गटतट विसरून सर्वांनी एकत्र येऊन सीमाप्रश्न सोडवुन घेण्यासाठी प्रयत्न करूया. तसेच वैयक्तीक स्वार्थ बाजूला सारून सर्वांनी समितीच्या एका झेंड्याखाली यावे, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दिगंबरराव पाटील, कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे, चिटणीस आबासाहेब दळवी आदिंनी केले आहे.
Check Also
लोकोळी येथील लक्ष्मी मंदिरात चोरी!
Spread the loveखानापूर : खानापूर तालुक्यातील लोकोळी येथील लक्ष्मी मंदिरात काल रात्री चोरी झाली असून …