Wednesday , March 4 2026
Breaking News

खानापूरात बीई इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

Spread the love

 

खानापूर : लक्ष्मी नगर खानापूर येथील रहिवासी व बीई इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्गात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी मंथन अशोक वड्डीन्नावर (19) याने आपल्या रहात्या घरात दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवार दि. 6 फेब्रुवारी दुपारी घडली आहे.
याबाबत समजलेली माहिती लक्ष्मी नगर खानापूर येथील रहिवासी व यडोगा ता. खानापूर येथील मराठी शाळेतील कन्नड शिक्षक अशोक वड्डीन्नावर यांचा कनिष्ठ मुलगा बेळगाव येथील बीई इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्गात शिकत होता. परीक्षा असल्याचे दुपारी मंथनचा मोठा भाऊ आणि मंथन आपापल्या रूममध्ये अभ्यास करत बसले होते. तुमचा मित्र आल्याने त्यांचा भाऊ मंथनला बोलावण्यासाठी त्याच्या रूममध्ये गेला असता, मंथन हा गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. मंथनची आई हारूरी येथील मराठी शाळेत शिक्षिका आहेत.

दरम्यान माजी आमदार व बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी त्यांच्या घरी जाऊन पोलिसांना याची कल्पना दिली व मृतदेह शवविच्छेदनासाठी खानापूर येथील सरकारी आरोग्य चिकित्सा केंद्रात दाखल केला. या ठिकाणी खानापूर तालुका पंचायतचे माजी उपसभापती व वन निगमचे माजी राज्य संचालक सुरेश देसाई व माजी तालुका पंचायत सदस्य अशोक देसाई आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *