
खानापूर : सरकारी कामासाठी दहा हजाराची लाच मागणाऱ्या जिल्हा पंचायत खानापूरचे असिस्टंट एक्झिक्यूटिव्ह इंजिनीयर (A E E.) डी एम बन्नूर यांना बेळगाव लोकायुक्त पोलिसांनी खिसे गरम करताना रंगेहाथ पकडले. लाच घेताना हाती लागलेल्या बन्नूर यांची कसून चौकशी सुरू आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, निलावडे ग्रामपंचायतचे उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते विनायक मुतगेकर यांनी केलेल्या तक्रारीनुसार लोकायुक्ताने ही कारवाई केली आहे. मुतगेकर यांनी एक बिल पास करण्यासाठी वारंवार सदर अधिकाऱ्यांना विनंती, वजा कार्यालयीन गिरट्या घातल्या पण अधिकारी लाँच घेतल्याशिवाय काम करत नाहीत हे लक्षात आल्याने त्यांनी लोकायुक्ताची संपर्क साधला व सापळा रचून सदर कार्यकारी अभियंते बन्नूर यांच्यावरही लोकायुक्त कारवाई झाली आहे यामुळे लेखा विभागातील अधिकाऱ्यात एकच खळबळ माजली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta