खानापूर : गोव्याहून बागलकोटला जाणाऱ्या एका इनोव्हा चालकाचा वाहनावरील ताबा तुटल्याने इनोव्हा रस्त्याकडे ला जाऊन पलटी झाली व यामध्ये एक जण जागीच ठार तर एकाच कुटुंबातील आणखी 3 जण गंभीर आणि चार जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली आहे. या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव सागर कृष्णा देशपांडे असे आहे. सदर देशपांडे कुटुंबीय गोव्याला गेले होते. तेथून ते बागलकोटला बेळगाव मार्गे जात असताना होनकल नजीक हा अपघात घडला आहे. खानापूर रामनगर या राष्ट्रीय मार्गाचे काम धीम्या गतीने चालू आहे त्यामुळे अनेक अपघात घडत आहेत. होनकल बेळगाव महामार्गावर चढताना चालकाचे झोप नियंत्रण तुटले. व इनोवा रस्त्याकडे ला जाऊन पलटी झाली, वाहन चकाचूर झाले आहे. यामध्ये सुदैवाने बाकी लोक बचावले आहेत. मात्र यापैकी आणखी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. त्यांना बेळगाव येथे अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले असून उर्वरित 4 जनाना खानापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. खानापूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून जखमींना अधिक उपचारासाठी बेळगाव येथे पाठवण्यात आले आहे.