बेळगाव : हलशीवाडी (ता. खानापूर) येथील युवा स्पोर्टस आयोजित आणि साहेब फौंडेशन पुरस्कृत भव्य क्रिकेट स्पर्धेमध्ये हिंडलगा येथील इंडियन बॉईज संघाने विजेतेपद मिळविले तर कणबर्गी संघ उपविजेता ठरला. विजेत्यांना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
हलशी येथील नरसेवाडी गायरान येथे आठ दिवसांपासून सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेत खानापूर, बेळगाव व जोयडा तालुक्यातील विविध संघानी भाग घेतला होता. पहिल्या उपांत्य सामन्यात जय गणेश कणबर्गी संघाने लोहित बीडी संघाचा पराभव करून तर हिंडलगा संघाने हलकर्णी संघाचा एकतर्फी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेस मिळविला होता.
अंतिम सामन्यात हिंडलगा संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 99 धावा बनवीत विजयासाठी कणबर्गी संघासमोर 100 धावांचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र हिंडलगा संघाच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे कणबर्गी संघ 68 धावांपर्यंत मजल मारू शकला. त्यामुळे हिंडलगा संघाला 31 धावांनी विजय मिळविला.
प्रमुख पाहुणे माजी आमदार मनोहर किणेकर यांनी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात स्पर्धांचे आयोजन करणाऱ्या युवा स्पोर्टस हलशीवाडी संघाचे कौतुक करण्यासारखे असून खेळाडूनी जय-पराजय याचा विचार न करता आपला खेळ दाखविणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले. विजेत्या व उपविजेत्या संघासह हलकर्णी संघाच्या भीमा तलवार, सामनावीर सुशांत कोवाडकर आदींना बेळगाव तालुका युवाआघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक, एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, साहेब फौंडेशनचे जॉन्सन रॉड्रिक्स, खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, आंबेवाडी ग्राम पंचायतीचे अध्यक्ष चेतक पाटील, बेळगुंदी पंचायतीचे सदस्य राजू किणेकर, खानापूर समितीचे सचिव गोपाळ देसाई, पी एच पाटील, हलशी पंचायतीचे सदस्य चंदू पटेल, पांडुरंग फौंडेकर आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रघुनाथ देसाई, मिलिंद देसाई, दिनेश देसाई, वैभव देसाई, शुभम देसाई, साईश सुतार, राजन सुतार, प्रशांत देसाई, वामन देसाई, अनंत देसाई, राजकुमार देसाई, रमेश देसाई, विलास देसाई, राजू देसाई, पुंडलीक देसाई आदींनी परिश्रम घेतले.
Check Also
दोडहोसुर नजीक दुचाकीची झाडाला धडक; एक जागीच
Spread the love खानापूर : दुचाकीस्वाराचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर दुचाकी आढळल्याने …