खानापूर : कारवार लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या खानापूर येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन रविवारी दुपारी चार वाजता होणार आहे.
वर्दे पेट्रोल पंप शेजारी सरदेसाई यांच्या कार्यालयाचे उद्घाटन होणार असून यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती व खानापूर तालुका समितीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील यांनी केले आहे.