खानापूर : मराठी भाषा संस्कृतीच्या अस्मितेसाठी सर्वांनी एकत्र येणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे मराठी भाषिकांनी आपली ताकद दाखवून द्यावी तसेच प्रत्येकाने आपण स्वतः हा उमेदवार समजून काम करावे तसेच कारवार लोकसभा मतदार संघातील समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांना विजयी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी, अशी आवाहन खानापूर तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी केले आहे.
कारवार मतदार संघातील समितीचे अधिकृत उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या प्रचारासाठी पारवाड, नेरसा आदी भागात आदि जनजागृती करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना देसाई यांनी आपल्या संस्कृती जतन करण्यासाठी सगळेजण आपण एकत्रित येणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पैशाच्या आयुष्याला बळी न पडता मराठी माणूस आणि एकत्र येऊन एकजुटीने हा लढा पुढे न्यायला हवा. मराठी माणूस कमकुवत झालेला नाही. एकमेकाला साह्य केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि आपला मराठी उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा असे मत व्यक्त केले.
सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी प्रचार करताना प्रत्येक गावात शक्ती प्रदर्शन करणे जरुरीचे आहे आणि त्यासाठी तालुक्यातील प्रत्येक नागरिकांनी व महिलांनी समीतीच्या प्रचारात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन केले.
रमेश धबाले यांनी समिती उमेदवाराच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ मान्यवरांना आणि राजकीय मंडळींना आमंत्रित करून मोठ्या जाहीर सभा घ्याव्या लागणार आहेत त्या दृष्टीने नियोजन केले जात असून तालुक्याच्या विविध भागात समितीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे यावेळी प्रशासनासह राष्ट्रीय पक्षांना मराठी भाषकांची ताकत दिसुन येईल असे मत व्यक्त केले.
उमेदवार निरंजन सरदेसाई, खानापूर विभाग समितीचे उपाध्यक्ष मारुती गुरव, बाळासाहेब शेलार आदींनी मनोगत व्यक्त केले.
पारवाड, कुसमळी, नेरासा व इतर गावात फेरी काढून अनेक नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या तसेच फेरी वेळी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी नेरसा ग्राम पंचायत अध्यक्ष रणजीत देसाई, गोविंद देसाई, रमेश देसाई, तुकाराम देवळी, देवाप्पा चौगुले, मुकुंद पाटील, सुधीर नावलकर, राजाराम देसाई, नागेश भोसले, सुरज पाटील, विशाल पाटील, राजाराम गावडे, कृष्णा गावडे, विठ्ठल गावडे, संजीव पाटील, कृष्णा धुळ्याचे, नामदेव पाटील, कृष्णा पाटील, बाळू बिरजे,, संदेश कोडचवाडकर आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta