कित्तूर : हुबळी -धारवाड महानगरपालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक यांची कन्या नेहा हिरेमठ हिच्या मारेकऱ्याला कठोर शिक्षा व्हावी व तिच्या आत्म्यास चिरशांती लाभावी यासाठी चिक्क बागेवाडी येथे डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली कँडल मोर्चा काढून श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी बोलताना डॉ. अंजलीताई निंबाळकर म्हणाल्या की, नेहा हिरेमठ हिची निर्घृण हत्या ही निंदनीय घटना आहे. अशा घटना भविष्यात घडू नये याची सरकारने काळजी घेतली पाहिजे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी.
यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या समवेत महिला वर्ग उपस्थित होता.