खानापूर : उत्तर कन्नड (कारवार) लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर आपल्या प्रचारार्थ उद्या रविवार दि. २१ रोजी खानापूर तालुक्यातील काही प्रमुख गावांना भेट देणार आहेत. सकाळी ९.३० वाजता पहिली भेट तोलगी या गावी नंतर
सकाळी १०.३० वाजता गंदिगवाड, दुपारी १२ वाजता – सुरपूर केरवाड, दुपारी १ वाजता – कक्केरी शेवटी संध्याकाळी ८ वाजता – करंबळ या ठिकाणी कोपरा सभांचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रमुख कार्यकर्ते व मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना मतयाचना करणार आहेत. तरी संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांनी तसेच पक्ष कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.