खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरात रविवारी आठवडी बाजाराचे निमित्त करून रविवारी दि. 12 रोजी तंबाखू विरोधी पथक जांबोटी क्रॉसवर सकाळी हजर झाले. खाकी पोशाखात असलेल्या पथकाने येथील पानशॉप मालकाला एक बॅनर देऊ केला व पानशॉप मालकाकडून 150 रूपये वसुल केले. मात्र कोणतीच पावती देऊ केली नाही.
यावेळी पथकाकडून पानशॉप मालकाना 18 वर्षाखालील मुलाना गुटखा, शिगारेट, तंबाखू, आदी साहित्याचे वाटप करणे कायद्याने बंदी आहे, असा फलक देऊ केला.
त्याशिवाय कोणताही तंबाखू जन्य साहित्य उघड्यावर ठेवणे कायद्याने गुन्हा आहे, असे सांगितले. कोणत्याही तुंबाखुसारख्या, गुटखा, मावा, सिगारेट, याचा जाहिरात फलक लावणे कायद्याने गुन्हा आहे, असे फलक लावु नये अशी सुचना केली.
रविवारी सरकारी सुट्टी असल्याने पथकाने खानापूर शहरातील पानशॉपकडून, किरणा दुकानदाराकडून 150 रूपये किमतीचा बॅनर सक्तीने विक्री केला, शिवाय कोणतीच पावती देऊ केली नाही.
त्यामुळे खानापूर शहरातील पानशॉपकडून, किराणा दुकानदाराकडून लुबाडणूक करीत असल्याचा दावा केला जात आहे.
तेव्हा संबंधित खात्याच्या अधिकारीवर्गाने याकडे लक्ष देऊन खानापूर शहरातील व्यावसायिकांची होणारी लुबाडणूक थांबवावी, अशी मागणी होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta