खानापूर : लोकोळी कत्री आणि जैनकोप कत्रीच्या मध्ये असलेल्या उतारतीला सोमवारी रात्री दुचाकीला अपघात होऊन झालेल्या घटनेत खानापूर पोलीस स्थानकाचे पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप बसवराज मिटगार (वय 28) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, खानापूर पोलीस स्थानकात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप बसवराज मिटगार, हे काल रात्री 22 एप्रिल रोजी आपली सेवा बजावून आपले गाव मुगळीहाळकडे जात असताना खानापूर पारिश्वाड मार्गावरील लोकोळी कत्री आणि जैनकोप कत्रीच्या मध्ये असलेल्या उतारतीला त्यांच्या दुचाकीचा अपघात होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सकाळी खानापूर पोलिसांना समजताच, मृतदेह खानापूर येथील सरकारी दवाखान्यात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे.