खानापूर : शनिवार दिनांक २७ एप्रिल २०२४ रोजी दुपारी दोन वाजता महाराष्ट्र एकीकरण समितीचे कारवार मतदार संघाचे लोकसभेचे उमेदवार श्री. निरंजनसिंह सरदेसाई यांचा प्रचार व कोपरासभा मणतुर्गे येथील पिंपळ कट्टा येथे पार पडला. यावेळी घरोघरी भेट देऊन मणतुर्गे ग्रामस्थ व महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पत्रके वाटून जनजागृती केली. येत्या ७ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये श्री. निरंजनसिंह सरदेसाई यांच्या “घागर” या चिन्हासमोरील बटण दाबून भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी तालुका पंचायत सदस्य श्री. बाळासाहेब शेलार यांनी केले.
यावेळी बोलताना शेलार म्हणाले, मणतुर्गे गावाला महाराष्ट्र एकीकरण समितीने कै. अशोकराव पाटील यांना दोन वेळा आमदारकी दिली, एकवेळ माजी जिल्हा पंचायत सदस्य श्री. विशाल अशोकराव पाटील यांना निवडून दिले, त्याचसोबत तालुका पंचायत सदस्यपदी सौ. रुपा राजाराम देवलतकर यांना तसेच मला देखील निवडून दिले. त्याचप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस पदही मणतुर्गे गावचे सुपुत्र श्री. आबासाहेब नारायणराव दळवी यांना बहाल केले आहे. एवढी पदे आपल्या गावाला दिलेली आहेत तेंव्हा आजवर दोन ते तीन वेळा समितीला १००% मतदान देऊन पहिला क्रमांक मिळविला आहे. तेंव्हा राष्ट्रीय पक्ष लालुच दाखवून गावातील मतदारांना संभ्रमीत करत आहेत तरी अशा राष्ट्रीय पक्षांच्या एजंटांपासून गावातील समितीच्या मतदारांनी जागरूक राहून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या इतिहासाची पुनरावृत्ती करावी व राष्ट्रीय पक्षांना योग्य ती जागा दाखवावी व समितीला निवडून द्यावे.
यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य श्री. विशाल अशोकराव पाटील यांनी सुध्दा म. ए. समितीच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, आमच्या गावांमध्ये कोणतेही गटतट नसून आम्ही सर्वजण एकोप्याने, एकदिलाने आजपर्यंत समितीच्या पाठीशी राहीलो आहोत. यापुढेही जनतेने संघटीतपणे माझे वडील कै. अशोकराव पाटलांना आमदार म्हणून दोन वेळा निवडून दिलात, मलाही सहकार्य केलात त्याचप्रमाणे श्री. निरंजनसिंह सरदेसाई यांना भरघोस मतांनी विजयी करा व लोकसभेत पाठवा असे आवाहन केले. यावेळी उमेदवार श्री. निरंजनसिंह सरदेसाई बोलतांना म्हणाले, गेल्या ६७ वर्षांमध्ये समिती सीमाप्रश्न सोडविण्यासाठी आजपर्यंत प्राणपणाने लढा देत आहे. पुर्वजांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता समितीला मतदान केले व आजपर्यंत आपला स्वाभिमान जिवंत ठेवला आहे परंतु भाजप, कॉंग्रेस, निजद या राष्ट्रीय पक्षांनी सीमाभागात कानडीकरणाचा वरवंटा फिरवत आहेत, अंगणवाडी शिक्षिकेची नेमणूक कानडी माध्यमाच्या शिक्षिकेची नेमणूक करून मराठीचा गळा घोटत आहेत. सरकार दरबारी अर्ज-विनंत्या करणारी परिपत्रके कानडीतुनच प्रकाशित केली जात आहेत आणि स्विकारली जात आहेत. असे असतांना मराठीचा टेंभा मिरविणारे राष्ट्रीय पक्षांच्या गळाला लागले आहेत. मणतुर्गे गावांमध्ये आजतागायत समिती शिवाय कुठल्याही पक्षाची प्रचार-बैठक गावातर्फे कोणीही पुढाकार घेऊन केली नाही. परंतु लोकसभेच्या निवडणुकीत मात्र एका राष्ट्रीय पक्षाची बैठक या गावातील एका तरूणाने घेऊन वर्तमान पत्रामध्ये तसे जाहीर केले आहे. तेंव्हा अशा या संधीसाधू तरुणांपासून गावातील मतदारांनी जागरूक रहावे. आजतागायत विकासाच्या दृष्टीने माझे काका कै. माजी आमदार श्री. निळकंठराव सरदेसाई यांनी १६ वर्षे आमदारकी केली, या काळात एक नवीन पैशाचाही भ्रष्टाचार न करता तालुक्याला विकासाच्या दृष्टीकोणातुन भाग्यलक्ष्मी सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केली. यामुळे हजारो शेतकऱ्यांना याचा फायदा झाला, त्याचप्रमाणे हजारो युवकांना रोजगार मिळाला. हे काम राष्ट्रीय पक्षांच्या कोणत्याही आमदारांने किंवा खासदारांने केले नाही. तेंव्हा यापुढे विकासाच्या दृष्टीकोणातुन, युवकांना काम देण्यासाठी तालुक्यातच विकास गंगा निर्माण करण्यासाठी मी तालुक्याचा भुमीपुत्र म्हणून मला भरभरून मतदान करा व लोकसभेत पाठवा. मी जोपर्यंत सीमाप्रश्न सुटत नाही तोपर्यंत मी सीमाप्रश्नाशी प्रामाणिक राहीन व बेइमानी करणार नाही. अनेकांनी समितीच्या नावावर तालुका पंचायत, जिल्हा पंचायत, आमदार अशी विविध पदांचा उपभोग घेऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना वार्यावर सोडून स्वार्थासाठी समितीचा त्याग करून राष्ट्रीय पक्षांत सामिल झाले. त्या पध्दतीचे आचरण मी कधीही करणार नाही असे मी अभिवचन देत आहोत. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत श्री. आबासाहेब नारायणराव दळवी यांनी केले.
सभेच्या अध्यक्षस्थानी गावचे वतनदार श्री. विलास गणपती पाटील व सौ. भाग्यश्री विलास पाटील होते. यावेळी गावातील सुवासिनी सौ. लक्ष्मी गुरव, सौ. प्रेमा गुंडपीकर, सौ. सुजाता देवकरी, सौ. चंद्रभागा शेलार, सौ. पार्वती देसाई, सौ. अंकिता पाटील, सौ. वैशाली गुंडपीकर, सौ. शितल देवकरी, सौ. सीमा देवकरी, सौ. भाग्यश्री पाटील यांनी लोकसभेचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार श्री. निरंजनसिंह सरदेसाई यांचे औक्षण केले. याप्रसंगी गावच्या वतीने उमेदवारांना मानाचा भगवा फेटा बांधून त्यांचा सन्मान करून भरघोस मतांनी विजयी करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी म ए समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई, श्री. राजाराम देसाई, श्री. सुनिल पाटील, श्री. रमेश धबाले, श्री. पुंडलिक पाटील, श्री. रामचंद्र गांवकर, श्री. रणजीत पाटील यांसह अनेक समिती पदाधिकारी, नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी गावचे पुजारी श्री. विष्णू गुंडू गुरव आणि सौ. लक्ष्मी विष्णू गुरव, गावचे ज्येष्ठ नागरिक श्री. नारायण बाबाजी गुंडपीकर, श्री वासुदेव आप्पाजी पाटील, श्री. विठोबा सातेरी देसाई, माजी जिल्हा पंचायत सदस्य श्री. विशाल अशोकराव पाटील आणि खानापूर अर्बन को-ऑपरेटीव्ह बॅंकेचे चेअरमन श्री. अमृत महादेवराव शेलार, प्रगतशील शेतकरी सौ. पार्वती व श्री. महादेव बळवंत देसाई, सौ. अंकीता व श्री राजाराम दत्तू पाटील, सौ. चंद्रभागा व श्री लक्ष्मण यशवंत शेलार, सौ. प्रेमा व श्री. वसंत विठोबा गुंडपीकर सेवानिवृत्त मुख्याध्यापक, सौ. वैशाली व श्री. बाबाजी नारायण गुंडपीकर सेवानिवृत्त वनाधिकारी, सौ. शितल व श्री हणमंत पुंडलिक देवकरी निवृत्त हेस्कॉम कर्मचारी, सौ. सुजाता व श्री श्रीपाद महादेव देवकरी माजी ग्रामपंचायत सदस्य, श्री कृष्णाजी नारायण देवलतकर सामाजिक कार्यकर्ते, सौ. सीमा व श्री. विठ्ठल कृष्णाजी देवकरी निवृत्त सुभेदार, श्री. तुकाराम बाबाजी गुंडपीकर, श्री. गुंडू पुण्णाप्पा गावडे निवृत्त मुख्याध्यापक, श्री. महादेव व्यंकाप्पा गावडे निवृत्त मुख्याध्यापक, श्री. गंगाराम नारायण देवलतकर निवृत्त मुख्याध्यापक, श्री. वसंत भरमाणी देवलतकर निवृत्त हेस्कॉम कर्मचारी, श्री. रामचंद्र यशवंत भटवाडकर निवृत्त हेस्कॉम कर्मचारी, श्री। नारायण महादेव पाटील निवृत्त हेस्कॉम कर्मचारी, श्री. शिवराम मष्णू पाटील निवृत्त हेस्कॉम कर्मचारी, श्री. नारायण गुंडु पाटील उद्योजक पुणे, श्री. प्रकाश नारायण गुरव निवृत्त पोस्टमन, श्री. नागेश सातेरी पाटील निवृत्त कर्मचारी मराठा मंडळ महाविद्यालय, श्री. अर्जुन नामदेव देवकरी सेवानिवृत्त जवान,
श्री. गोपाळ मुरारी पाटील मध्यवर्ती म ए समिती सदस्य गर्लगुंजी उपस्थित होते.