Tuesday , March 3 2026
Breaking News

खानापूर – जांबोटी मार्गावर ट्रकने ठोकरल्याने दुचाकीस्वार ठार

Spread the love

 

खानापूर : खानापूर-जांबोटी मार्गावरील बाचोळी कत्री (शनया) समोर एक्टिवा दुचाकीला ट्रकने पाठीमागून ठोकल्याने एक जण ठार झाल्याची घटना आज दुपारी 12.30 च्या दरम्यान घडली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, खानापूर तालुक्यातील शिवठाण येथील युवक विदेश तुकाराम मिराशी (वय 28) हा आपल्या मित्रासह शुभम गार्डन येथील एका लग्न समारंभासाठी एक्टिवा दुचाकीवरून जात असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या एका ट्रकने ठोकल्याने पाठीमागे बसलेला त्याचा मित्र बाजूला उडून पडला तर विदेश तुकाराम मिराशी रस्त्यावरच पडल्याने ट्रकचे चाक त्याच्या मांडीवरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला असता तेथील नागरिकांनी त्याला ताबडतोब खानापूर सरकारी दवाखान्यात दाखल केले. परंतु त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

सदर ट्रक, एका लग्नाचे वऱ्हाड घेऊन लग्नकार्यासाठी जात असल्याचे समजते. अपघात होताच ट्रक चालकाने ट्रक न थांबवताच तसाच पुढे निघून गेल्याचे समजते. याबाबत खानापूर पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली असून पुढील तपास खानापूर पोलीस करीत आहेत. पोलिसांना व डॉक्टरांना पंचनामा व कायदेशीर बाबी लवकर पूर्ण करण्यास सांगितले आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *