खानापूर (वार्ता) : खानापूर शहरातील बेळगाव-पणजी महामार्गावरील होसमणी पेट्रोल पंपला लागून असलेल्या प्रभाकर चिनवाल यांच्या सागर पानशॉपमध्ये शुक्रवारी दि. 17 रोजी मध्यरात्री दोन ते तीन वाजण्याच्या दरम्यान चोरट्यांनी सागर पानशॉपच्या मागील बाजुस पानशॉपचा लोखंडी पत्रा कापून आत शिरकाव केला. त्यानंतर 6 ते 7 हजार रूपये किमतीची सिगारेटची बंडल, 3 ते 4 हजार रुपये किमतीची गुटखाचे बंडल, 2 ते हजार रूपये किमतीचे कोल्ड्रिंक्स तसेच गल्ल्यातील 3 ते 4 हजार रूपये रोखड व चिल्लर 3 ते 4 शे रूपये असा एकूण 15 ते 16 हजार रूपयाचा माल लंपास केला आहे.
यावेळी खानापूर पोलिसानी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मात्र चोरी पत्ता लागु शकला नाही.
सागर पानशॉपचे मालक गुरूवारी रात्री 12 वाजेपर्यंत दुकान होते. रात्री 12 नंतर ते पानशॉप बंद करून घरी झोपी गेले. त्याऩतर मध्यरात्री 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी डाव साधला.
सागर पानशॉप हे होसमणी पेट्रोल पंपाला लागुन आहे. शिवाय समोरून महामार्ग ही आहे. अशा वर्दळीच्या भागात चोरट्यांनी चोरी केली. त्यामुळे व्यापारी वर्गातून घाबराट पसरली आहे.
पंधरा दिवसाच्या मागे शहरात सोन्याची चोरी झाली होती. खानापूर शहरात चोरट्यांनी चोरीचे सत्र चालुच ठेवले आहे. याकडे खानापूर पोलिस खात्याचे साफ दुर्लक्ष झाले आहे. रात्रीच गस्त घालण्याकडे पोलिस कमी पडत आहेत. तेव्हा लोकप्रतिनिधीनी पोलिस खात्यावर वचक ठेवून राहणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया खानापूर शहरातील रहिवाशांकडून बोलली जात आहे. पोलिस खात्याने चोरीचा तपास लावून जनतेला सहकार्य करावे, अशी मागणी केली जात आहे.