खानापूर : तिकीट तपासण्यासाठी आलेल्या टीसीवर प्रवाशाने प्राणघातक हल्ला केला असता टीसीला वाचवण्यासाठी गेलेल्या इतर चार जणांवर प्राणघातक हल्ला झाला असून यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून इतर जखमींवर बेळगाव येथे जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, चालुक्य एक्सप्रेस (पॉंडेचेरी-दादर) रेल्वेमध्ये टीसी प्रवाश्यांचे तिकीट तपासात असताना मास्क परिधान केलेल्या एका प्रवाशाला तिकीट विचारले असता सदर प्रवाशाने टीसीवर चाकूने हल्ला केला. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या इतर चार प्रवाश्यांवर देखील त्या युवकाने हल्ला केला व त्यानंतर तो हल्लेखोर फरार झाला आहे. सदर घटना लोंढा रेल्वेस्थानक ते खानापूर रेल्वे दरम्यान घडली असून रेल्वे पोलीस पुढील तपास करीत आहेत.