खानापूर : खानापूर तालुक्यातील कक्केरी येथील सैनिक मंजुनाथ अंबडगट्टी (वय ३५) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
गेल्या 16 वर्षांपासून मंजुनाथ हे भारतीय लष्कराच्या इंजिनिअर रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. गेल्या शुक्रवारी एका अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना दिल्लीतील मिलिटरी बीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचाराचा उपयोग न झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
मयत जवान मंजुनाथ अंबडगट्टी याचे पार्थिव त्याच्या मूळ गावी कक्केरी येथे आणण्यात आल्यानंतर दुःखाचा डोंगर कोसळलेल्या अंबडगट्टी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. शोकाकुल वातावरणात मंजुनाथ यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.