खानापूर : विद्यार्थ्यांनी मोबाईल किंवा इतर गोष्टींकडे लक्ष न देता दररोज योग करण्याकडे अधिक लक्ष दिल्यास विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता निर्माण होईल आणि विद्यार्थी अधिक चांगल्या प्रकारे अभ्यासासह इतर गोष्टींकडे लक्ष देऊ शकतील असे प्रतिपादन हलशी येथील छत्रपती शिवाजी विद्यामंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक किरण देसाई केले आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने शिवाजी हायस्कूलच्या मैदानावर सामूहिक योगाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. प्रारंभी शाळेचे सहशिक्षक शंकर रागी पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक देसाई यांनी प्राचीन काळापासून योग कला अस्तित्वात आहे. तसेच अनेक पुस्तकांमध्ये आणि पौराणिक कथांमध्ये योगाचे महत्त्व पटवून देण्यात आले आहे. तसेच जगाला देखील योगाचे महत्त्व पटले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी देखील योगाचे महत्त्व समजून घेत दररोज इतर गोष्टीकडे लक्ष न देता योग करण्याकडे लक्ष दिले तर अधिक चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगल्या प्रकारे सजवून राहील. तसेच याबाबत घरातील लोकांना देखील योगाचे महत्त्व समजावून सांगावे असे सांगितले.
शाळा सुधारणा कमिटीचे अर्जुन देसाई यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शाळेतील सहशिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.