खानापूर : दि. विनर्स सौहार्द सहकारी संघ जांबोटी यांच्यावतीने जांबोटी परिसरातील शेतकऱ्यांसाठी आंबा व लिंबूच्या फळझाडांचे मोफत वितरण करण्यात आले. पर्यावरण रक्षणाची गरज व शेतकऱ्यांना फळबागेतून उत्पन्न मिळावे या भावनेतून दि. विनर्स सोहार्दचे चेअरमन श्री. सुरेश गंभीर यांच्या हस्ते या रोपांचे वितरण करण्यात आले. जवळपास शंभर शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला. यापुढेही विनर्स सौहार्दच्या माध्यमातून सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल असे सुरेश गंभीर यांनी कळविले आहे. यावेळी संस्थेचे सेक्रेटरी संतोष गुरव, संचालक रूपा कुलकर्णी उपस्थित होते. आभार विजयकुमार वड्डर यांनी व्यक्त केले.
Belgaum Varta Belgaum Varta